Journey with B.Y.L. Nair Hospital 2023

 

 

स्त्री कर्करोग रुग्ण !

सध्या आरोग्य विभागात काम करत असताना दररोज स्तनाचा कर्करोग झालेल्या महिलांसोबत भेट होते.  खुप विचार  मनात गेल्या 6 महिन्यात  घोळत आहेत  ते उतरवत आहे.

(Breast is a women's sex organ):-

 महिला   ही  जाहीराती मध्ये  product selling साठी अजूनही तिच्या शरिराच्या बांध्यावरून निवडली जाते. सध्याच्या काळात  "Body Shaming" ही संकल्पना जोरावर राबवली जातेय  आता XXXL ची model  पण products selling साठी जाहिरातीत दिसतेय!!  समाज कौतुक करतोय याच!! कारण महिला तिच्या शरिराला स्विकार करतेय तशीच तिला तिच्या इच्छेनुसार कपड्याच्या फॅशन ला तडजोड नाही करावी लागत आहे. बदल स्वीकारायला नक्कीच वेळ लागतो पण आपला समाज हा खुप स्विकात्मक ही आहे (positive acceptance) वेळेनुसार तो सकारात्मक स्विकार होतो.

 आता मुळ मुद्दा हा की स्त्रीच्या शरीरात जे जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत बदल होत आहे ते कसे स्वीकारावे!! आणि यातच ती महिला जर कर्करोग या असाध्य  रोगाने ग्रस्त झाली तर तिची मानसिक अवस्था! शारिरीक झीज! लैंगिक संबंध! यावर तिला उपचार घेतानाच आर्धा मृत्यू येऊन गेलेला असतो. यातही पुन्हा समाजातील कुठल्या घरात तिचा जन्म / लग्न झाले आहे त्यानुसार तिला मिळाणारा सपोर्ट!! हो एकीकडे सध्या पुरूष स्वतःच्या बाळाच्या जन्मा वेळी पत्नीसोबत  labor room मध्ये support साठी जातोय!! हा बदल आहे कारण पुर्वी पत्नीला गरोदर करण्यासाठी फक्त पतीची महत्वाची भूमिका असायची; त्या नंतर बाळाला जन्म देण्यापासून ते संगोपनाची मुख्य भूमिका ही महिलांचीच होती!! घरातील स्त्रीया ही आपल्या मुली सुणांना हीच शिकवण देत. आता पुरूषाचे काम संपल बाळाची सगळी जबाबदारी तुझी! मग मुलगी जन्माला आली तिही बर का !!

स्त्रीला मुळातच निसर्गाने strong बनवल आहे. पण  समाजाणे आपल्या सोयिनुसार तिची कोमलता , कठोरता का ठरवावी ? कोणत्याही व्यक्तीला  त्या त्या वेळी भावनिक आधराची गरज असते(ether a male or female ) . आणि जर ती एक स्तनाचा कर्करोग ग्रस्त स्त्री असेल तर जास्त !! रोगाच्या उपचारात तिचे केस जाणे; टक्कल पडणे, and what’s about sex organ! When her Brest removed!! ती ठार तुट्त असेल. दररोजची सकाळ तिला आतून मोडून टाकत असेल! ख़चली जाते ती... आणि या रोगाविषयी  ब-यापैकी बोलल जातय , आहारा विषयी ही खुलेपणाने बोलतो आपण पण तिच शरीर- शारिरीक गरज !  यावर किती बोलतो? का बोलतच नाही. या बाबतित विचार आला तरी तो दाबून टाकायचा कसा ही कला आपल्याला लहाणपणापासून चांगलीच  शिकवली जाते. पण आपण बोलुयात , आपण ख़ुलेपणा ने या गरजेवर ही बोलायला पाहिजे. “मला एक नेहमी   साध उदाहरण सुचत घराची दारे  खिडक्या खुप काळ , बंद ठेवलीन की घरात ही दुरग़धी येते! We need fresh air and sunlight everyday to keep healthy atmosphere!! Then why not  accept fresh thoughts!!”

 सध्याच्या काळात रुग्णालयात काम करत असतानाचा एक निरिक्षण  आहे की या ब‌-याच कर्करोग ग्रस्त महिला उपचारासाठी एकट्या येतात . तिचा पती नसतो सोबत तिला विचारल तर ती खाली मान करते (मी हे प्रत्येक पुरुषा साठी नाही बोलत परंतु प्रमाण अधीक आहे). ज्या पत्नी सोबत 4-5 मुल  जन्माला देवू शकणारा पती  आता तिची सोबत सोड्तो !  तिच असण फ़क्त शारिरीक आहे का ? तिचा एक अवयव नसेल तर तिचा स्त्रीतत्वाचा अधिकार जातो का ! मी सुरुवातीला बोलले तस शरिरात बद्ल होतो मासिकपाळीपासुन ते मेनोपॉज पर्यंत. तो स्विकारत आहोत ना आपण !तर स्त्री ला सौंदर्याच्या चौकटीत किती काळ अड्कवणयोग्यआहे ? मुळात दिसण्या मध्ये तुमची स्वत:ची अशी भुमीका नसते (All credit goes to your gens) आपली त्वचा रंग, नाक, डोळे, केस, उंची सगळ हे पालकांकडून येत. त्याचा अहंकार कशासाठी! पण योग्य विचार करण तर   पुर्णत: आपल्यावर अवलंबून आहे. या स्री यांसाठी आता ब्रेस्ट काढ्ल्यावर एक ब्रा दिली जातेय तिला आरशात पाहिल्यावर किंवा समाजात सहज फिरता येणे यामुळे शक्य होतय. तो ही मोठा भावनीक आधार आहे. हे खुलेपणाने  होण्याकरीता समाजात जागृती होणे हा खुप मोठा मुद्दा आहे त्यावर आम्ही रुग्णालयात काम सुरु केल आहे. ही सुवीधा  ट्रस्ट  मार्फ़त मोफ़त देत आहोत.

कर्करोगात  स्त्री च्या  माणसिक आरोग्याची काळजी ही  योग्य उपचार पद्धती सोबत चालु ठेवणे मुख्य मुद्दा आहे अस  मला एक वैद्यकिय प्रणालीतिल घट्क म्हणून जाणवत आहे.    या जिवघेण्या आजारावर   मात करण साध्य होईल जेव्हा माणसिक आरोग्यात तणाव मुक्त असेल.

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

मी एक पुरुष आहे ! मी एक स्त्रि आहे!!

“ती अशी का वागली असावी..........?”