Posts

Journey with B.Y.L. Nair Hospital 2023

    स्त्री कर्करोग रुग्ण ! सध्या आरोग्य विभागात काम करत असताना दररोज स्तनाचा कर्करोग झालेल्या महिलांसोबत भेट होते.   खुप विचार   मनात गेल्या 6 महिन्यात   घोळत आहेत   ते उतरवत आहे. (Breast is a women's sex organ):-   महिला    ही   जाहीराती मध्ये   product selling साठी अजूनही तिच्या शरिराच्या बांध्यावरून निवडली जाते. सध्याच्या काळात   " Body Shaming" ही संकल्पना जोरावर राबवली जातेय   आता XXXL ची model   पण products selling साठी जाहिरातीत दिसतेय!!   समाज कौतुक करतोय याच!! कारण महिला तिच्या शरिराला स्विकार करतेय तशीच तिला तिच्या इच्छेनुसार कपड्याच्या फॅशन ला तडजोड नाही करावी लागत आहे. बदल स्वीकारायला नक्कीच वेळ लागतो पण आपला समाज हा खुप स्विकात्मक ही आहे ( positive acceptance) वेळेनुसार तो सकारात्मक स्विकार होतो.   आता मुळ मुद्दा हा की स्त्रीच्या शरीरात जे जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत बदल होत आहे ते कसे स्वीकारावे!! आणि यातच ती महिला जर कर्करोग या असाध्य   रोगाने ग्रस्त झाली तर तिची मानसिक अवस्था! शारिरीक झीज! लैंगिक संबंध! यावर तिला उपचार घेतानाच आर्धा मृत्यू य

मी एक पुरुष आहे ! मी एक स्त्रि आहे!!

मी लहान होते जवळ जवळ ७  ते ८ वर्षाची असेल, त्यावयातील इतर मुलांप्रमाणे मी आणि इतर मैत्रिणी खेळायचो, मजा-मस्ती-धमाल करायचो पण आता आठ्वतोय तो रोहीत! रोहीत माझा  बालमित्र, गोरा,नाजुक,तो रड्ला की लालबुंद होत असे.  आमच्या मुलींमध्ये खेळायला त्याला आवडायचे; आम्ही सुद्धा घेत असू  त्याला खेळायला. तो मुलीसोबत खेळ्तो म्ह्णुन  त्याला सगळे हसत,  मुलीत मुलगा लाडोंबा! .... पण इतरांप्रमाणे मीही त्याला चिडवले होतेच केव्हातरी......... आज  २० वर्षानी  त्या गोष्टीची  जाणीव होतेय!  कीती  चुकीच्या गोष्टी  होत्या त्या मुलांसारखे खेळ खेळणे, रोब गाजवणे, मोकळेपणाने न रडणे ही पुरुषी ओळख़ .  स्त्रि- व पुरुष  यांची  विभिन्नतेची  पाळेमुळे  बालपणापासूनच खुप खोलवर रोवली जातात आपल्यावर आणि मोठेपणीनी याच झाडाच्या सावलीचा खोटा आनंद उपभोगत असतो आपण सगळे. मनुष्याच्या वाढ्त्या वयाप्रमाणेच त्याचे अनुभव  देखील वाढ्त असतात. कुंटूबातील आपले वडील, भाऊ यांना आपला रक्षक,आधार म्हणुन पाहत मोठे होत  असतो, पण त्याच वेळी आपण आपल्या घराबाहेरील पुरूषांन पासून असुरक्षीत,भयभीत असतो, त्यांच्या सोबतीत सांक्षकता -अविश्वास असतो. मला आठ्

“ती अशी का वागली असावी..........?”

“ ती अशी का वागली असावी.......... ?” रोजच्या प्रमणेच  आज ही सकाळी लवकर 7 ते 7.15 च्या दरम्यान शेलटर उघडत होते. मी दररोज लवकर येई म्ह्णून शेलटरची चावी मा झ्या जवळच  दिली होती. शिवजीनगर  गावठाना मध्येच आम्ही एक वाडा भाडोत्तरी तत्वावर  घेतला होता. सकाळी 7.30 ते सांयकाळी 5.00 वाजेपर्यँत येथे रस्त्यावरच्या मुलां करीता अनौपचरीक शाळा चालवण्यात येत असे. या शाळेचा उद्देश हा –  रस्त्यावर राहणा-या मुलांना शिक्षणाच्या  प्रवाहात आणने.                  ‌-  मुलांच्या हक्कांचा प्रचार- प्रसार  तसेच संरक्षण  करणे . अनेकदा शहरतील शाळां मध्ये प्रवेश घेणारी मुले म्हंटल की निटनेटकी , गणवेश , ड्ब्बा , बुट- मोजे , दप्तर वगैरे अशीच डोळ्यां समोर पटकन  येतात ; परंतु आमच्या शाळेत प्रवेश घेणारी मुले ही  मानभर केस वाढ्लेली , त्यातच इकडून तिकडुन पडणा‌‌-या उवा - लिका , कपड्यांवर करकचटून बसलेली धूळ-माती आणि आंगभर माखलेला मळ ! या मुलांच्या दिवसाची सुरुवात ही साधारण ९.०० - १०.००  कधी १२.०० वाजताही होत असे. रस्त्यावर गाड्यांची रेलचेल वाढली की त्याच्या घंटा - गजराने आणि सुर्याच्या गरमागरम चटक्यांनी त्यांना त्यांचा
खुप  दिवसांन पासून माझ्या  काही जवळच्या मित्रांना  मी माझे विचार लिहावेत अस वाटत होत ............इथे  या लेखात माझा हा छोटासा प्रयत्न ! मंग माझा दोष काय......... ? मी सफिक सलिम शेख , वय  असावे आसपास 5 वर्ष ; ते ही संस्थेतल्या ताईच्या सांगण्यावरुन , कारण मला माहितच नाही  की माझा जन्म कधी , कुठे आणि कुठल्या  परिस्थितीत झाला. आब्बा (सलिम शेख ) सांगतो की मी  आणि मेह्बूब (माझा मोठा भाऊ) त्याची पोरं आहोत  म्ह्णून तो आमचा बाप ! और  ह्मारी माँ ...............पता नही मर गई है शायद कारण पैदा होने के बाद कभी देखी ही नही! गंगेवर (नशिक चा गंगा घाट ) मी , आब्बा आणि मेह्बूब एका खोपटीत रात्री झोपायला जातो. असा मी एकटा नाही जिस के पास घ्रर नही का त्याच्या आई – बापाचा ठाव ठीकाणा नाही त्ये सगळे  या घाटावर राहतात आशा खोप ट्या करुन .   इथ लय मोठी माणंस रोजच्याला येतात , घाटावर मेलेल्या लोकांची शांती करतात ना ! ही लोक पुजा झाल्यावर गंगेत पैसे टाकतात आणि आम्ही सगळी पोर दिवस भर गंगेत उड्या मारुन त्ये पैसे गोळा करतो , दिलच तर इथल्या दुकानदारांच्या दुकानात , हॉटेलात , भेळीच्या ठेल्यावर नाह