Posts

Showing posts from October, 2011
खुप  दिवसांन पासून माझ्या  काही जवळच्या मित्रांना  मी माझे विचार लिहावेत अस वाटत होत ............इथे  या लेखात माझा हा छोटासा प्रयत्न ! मंग माझा दोष काय......... ? मी सफिक सलिम शेख , वय  असावे आसपास 5 वर्ष ; ते ही संस्थेतल्या ताईच्या सांगण्यावरुन , कारण मला माहितच नाही  की माझा जन्म कधी , कुठे आणि कुठल्या  परिस्थितीत झाला. आब्बा (सलिम शेख ) सांगतो की मी  आणि मेह्बूब (माझा मोठा भाऊ) त्याची पोरं आहोत  म्ह्णून तो आमचा बाप ! और  ह्मारी माँ ...............पता नही मर गई है शायद कारण पैदा होने के बाद कभी देखी ही नही! गंगेवर (नशिक चा गंगा घाट ) मी , आब्बा आणि मेह्बूब एका खोपटीत रात्री झोपायला जातो. असा मी एकटा नाही जिस के पास घ्रर नही का त्याच्या आई – बापाचा ठाव ठीकाणा नाही त्ये सगळे  या घाटावर राहतात आशा खोप ट्या करुन .   इथ लय मोठी माणंस रोजच्याला येतात , घाटावर मेलेल्या लोकांची शांती करतात ना ! ही लोक पुजा झाल्यावर गंगेत पैसे टाकतात आणि आम्ही सगळी पोर दिवस भर गंगेत उड्या मारुन त्ये पैसे गोळा करतो , दिलच तर इथल्या दुकानदारांच्या दुकानात , हॉटेलात , भेळीच्या ठेल्यावर नाह