love your life .........because you and your life is very beautiful

smile smile smile and just smile .............because if your smile spread happiness in others life so why not!!!! :)

Sunday, 16 October 2011


खुप  दिवसांन पासून माझ्या  काही जवळच्या मित्रांना  मी माझे विचार लिहावेत अस वाटत होत ............इथे  या लेखात माझा हा छोटासा प्रयत्न !
मंग माझा दोष काय.........?

मी सफिक सलिम शेख, वय  असावे आसपास 5 वर्ष; ते ही संस्थेतल्या ताईच्या सांगण्यावरुन, कारण मला माहितच नाही  की माझा जन्म कधी, कुठे आणि कुठल्या  परिस्थितीत झाला. आब्बा (सलिम शेख ) सांगतो की मी  आणि मेह्बूब (माझा मोठा भाऊ) त्याची पोरं आहोत  म्ह्णून तो आमचा बाप ! और  ह्मारी माँ ...............पता नही मर गई है शायद कारण पैदा होने के बाद कभी देखी ही नही!
गंगेवर (नशिक चा गंगा घाट ) मी ,आब्बा आणि मेह्बूब एका खोपटीत रात्री झोपायला जातो. असा मी एकटा नाही जिस के पास घ्रर नही का त्याच्या आई – बापाचा ठाव ठीकाणा नाही त्ये सगळे  या घाटावर राहतात आशा खोपट्या करुन. 
 इथ लय मोठी माणंस रोजच्याला येतात , घाटावर मेलेल्या लोकांची शांती करतात ना ! ही लोक पुजा झाल्यावर गंगेत पैसे टाकतात आणि आम्ही सगळी पोर दिवस भर गंगेत उड्या मारुन त्ये पैसे गोळा करतो, दिलच तर इथल्या दुकानदारांच्या दुकानात, हॉटेलात, भेळीच्या ठेल्यावर नाहीतर चायनीज च्या गाड्यां वर् काम करतो. खाऊण-पिऊण २०-३० रुपये भेटतात. याच पैशाने बुधवारच्या बाजारातुन पोर आपल्या साठी कपडे, बुट आणि खायल घेतात.
मी छोटा होतो म्ह्णुन सविता (गंगेवरची एक मुलगी ) ने मला  संध्याकाळी भेळीच्या ठेल्यावर कामाला लावल. आलेल्या लोकांना भेल की प्लेट  देणा, उंनकी झूटी प्लेट उठा के दुसरे लडके के पास धोने देने का काम था.  ठेल्याचा मालक भोह्त कमीना था  काम करके भी 5 या 10 रुपये  ही देता  था . भेल तो  कभी खाने को देता ही नही था , ९.३० बजे तक रुका तो ही थोडी भेल मिलती थी , मे रुकता था क्योंकी खोपटीत पण माझी वाट बघणार कोणीच नव्हत ना ! आब्बा दारु पिऊण पडलेला असायचा आणि मेह्ब्बुब गाडगे बाबांच्या मठातुन आम्हाला जेवायला आणायला जायचा.
खोपटीत आल्यावर आब्बाला उठुन आम्ही त्याला जेवायला घालत , पिलेला असताना तो नेहमी म्ह्णत “ मी तुमच्यासाठी दुसरं लग्न केल नाही, में ही तुम्हारी माँ और बाप हूँ. ” इस लिए ह्मउसे  कभी कुछ नही बोला करते थे , क्योंकी सुभे वोही आब्बा ह्म दोनो को चाय पिला ता, मंदिर ले जाता  वहा ह्म दोनो को दिन  के खर्चे के लिये 2-2 रुपये देके छोड के चला जाता.
एक दिन अचानक आम्हाला संस्थेच्या ताई ने गंगेवर फिरताना पाहीले. तीने आमची पुच्छ्ताज केली, गंगेवरल्या काही पोरं बोलली की ......संस्थेत जेवायला पण देतत .. तो फिर में और मेह्ब्बुब दोनो संस्था में जाने  के लिए तयार हुए.
अब अब्बा ह्मे सुभे ७.३० बजे  संस्था में छोड के जाया करते थे, मला पण आवडयच  तिकड जायला कारण  शाम  में ५.००  बजे छोड देते थे वो लोग उपरसे खाना मिलता था, ताई- दादा पढाते थे ह्में.  सुभे जाके  तिथच आंघोळ करायचो, एक ग्लास दुध मिलता था ओर एक प्लेट  नाष्टा. खिलोने भि थे वहा खेलने के लिए .........जो कुछ मुझे अपने पैदा होनेपर कभी नही मिला वो  सब वहा था .
संस्थेत सगळ्यात छोटा मीच असल्याने माझा सगळे खुप लाड करत ........लाड , प्यार क्या होता है उसका मत्लब भी वही जाके पता चला.
संस्था में हर रोज जा रहा था, ताई ने मुझे जिंदगी से प्यार करणा सिखाया था ....तभी अचानक एक दिन ...............पता चला की आब्बा घाटवरच्या संडसा समोर मरुन पडलाय.
सब खतम हो जायेगा ये कभी सोचा नही था . आब्बा के जाने के बाद संस्था मे ह्मारे बारे मे बात शुरु हुई थी क्योंकी अब्बा के जाते ही घाट के मुस्लिम जात के कुछ लोग हम पे ह्क दिखा रहे थे. दुसरे ही दिन हमे ताई- दादा  रिमांड होम  लेके आये मुझे समज मे आया की आम्हला आता ताई- दादा इथंच सोडुन जानार ते . दादा पेपर वर काही लिहुन देत होता आणि मी आणि मेहब्बुब ताई जवळ उभे होतो. ताई सांगत होती की ही आपल्या सारखीच बल्की उसे भी बडी संस्था है, यहा बोहोत सारे बच्चे है, मे यहा भी पढ सकता हुँ.  बुरा तो लग रहा था की मी माझ्या गंगा घाटाला सोडुन , ताई- दादांना सोडुन इथ राहनार ! मी खुप रडु लागलो .......ताई को बोला मी आपल्याच संस्थेत राह्तो, आभ्यास पण  तिथंच करिल ............पण ताई- दादा बोले की रात को वहा रेहने के लिए जगे नही ओर  तब से हम वही रेहने लगे .
बाद में पता चला की जिन किसी बच्चे के माँ – बाप नही वो सब बच्चे  येसे ही संस्था में रेहते है. यहा पे भी खाना मिलता है , आंघोळ मिळती,  इधर भी मास्तर है, बडी मॅडम भी है पर  …………………………………………… में जब भी  किताब में से वो  कहानी पढता - जिसमें माँ  रात मे उसके बच्चे को  लोरी गा के सुलाती है, आब्बा मिठायॉ लाते ...........तो सोचता  हुँ .... मंग माझा दोष काय.........?

1 comment:

  1. ग्रेट स्मिता!!! खरच खूप छान लिहिलं आहेस.... अगदी जीवंत वर्णन झालं आहे.... एकदम विषयाला हात घालण्याची शैलीही आवडली. खरोखर छान लिहू शकतेस. लिहिताना स्पष्टताही आहे. खरंच आवडलं.... आता पुढच्या भागाची वाट पाहतोय.

    ReplyDelete