मी एक पुरुष आहे ! मी एक स्त्रि आहे!!


मी लहान होते जवळ जवळ ७  ते ८ वर्षाची असेल, त्यावयातील इतर मुलांप्रमाणे मी आणि इतर मैत्रिणी खेळायचो, मजा-मस्ती-धमाल करायचो पण आता आठ्वतोय तो रोहीत! रोहीत माझा  बालमित्र, गोरा,नाजुक,तो रड्ला की लालबुंद होत असे.  आमच्या मुलींमध्ये खेळायला त्याला आवडायचे; आम्ही सुद्धा घेत असू  त्याला खेळायला. तो मुलीसोबत खेळ्तो म्ह्णुन  त्याला सगळे हसत,  मुलीत मुलगा लाडोंबा! .... पण इतरांप्रमाणे मीही त्याला चिडवले होतेच केव्हातरी......... आज  २० वर्षानी  त्या गोष्टीची  जाणीव होतेय!  कीती  चुकीच्या गोष्टी  होत्या त्या मुलांसारखे खेळ खेळणे, रोब गाजवणे, मोकळेपणाने न रडणे ही पुरुषी ओळख़.  स्त्रि- व पुरुष  यांची  विभिन्नतेची  पाळेमुळे  बालपणापासूनच खुप खोलवर रोवली जातात आपल्यावर आणि मोठेपणीनी याच झाडाच्या सावलीचा खोटा आनंद उपभोगत असतो आपण सगळे.
मनुष्याच्या वाढ्त्या वयाप्रमाणेच त्याचे अनुभव  देखील वाढ्त असतात. कुंटूबातील आपले वडील, भाऊ यांना आपला रक्षक,आधार म्हणुन पाहत मोठे होत  असतो, पण त्याच वेळी आपण आपल्या घराबाहेरील पुरूषांन पासून असुरक्षीत,भयभीत असतो, त्यांच्या सोबतीत सांक्षकता -अविश्वास असतो.
मला आठ्वतय की मी ९वी-१०वी ला असताना किशोरवयीन मुलांच्या  मनामध्ये ज्या भावना उत्पन्न  होतात त्याला मीही अपवाद नव्ह्तेच!  सुंदर दिसावे त्यासाठीची धडपड . आपल्यालही वर्गातील मुलांने पहावे, आपली मैत्री सगळ्यांना हवीहवीशि वाटवी हे इतकच खुप होत.  पण  मुलींचे झालेले  आकर्षण, प्रेम हे आपल्याकडे तुच्छ्तेने, असंस्कारी, अपवित्रतेने,असन्मानजणक मानले जाते.   मुली  आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करुच शकत नाही , जी मुलगी हे व्यक्त  करते तिच्या चारित्र्यावर बोट ठेवले जाते;  अशा  भावना व्यक्त करणे ही सभ्य स्त्रियांची ओळख़ नाही. 

स्त्रि ही हळवी असावी, ती  सुंदर असावी, सालसी  असावी, तीने सगळ्या घरातील काम  जसे की कपडे धुणे,भांडी स्वछ कराणे, लादी पुसणे,स्वयंपाक करणे,मुलांनचा सांभाळ  कराणे, पाहुण्यांचे आदरतिथ्य कराणे,  .... अशी अनेक कामे ही एका  स्त्रिची. मी  रोज पाहते साधारण विभागात अजुनही  घ्र्रकाम करायला येणा-या या मावशीच  असतात.
 त्याच पद्द्तीने  पाहीले तर अजूनही पुरुष हा  कड्क, बलवान, कष्टांची कामे करणारा, भावना लपवणारा असावा  या  गोष्टी  दाखविण्याची ईछा  असो वा नसो  प्रत्येक पुरुषाला  हे त्याच्या पुरुषी ओळखीसाठी  दाखवावेच लागते.   

 मी एक पुरुष नसबंदी करणा-या पुरुषांचे संशोधन करीत होते तेव्हा लक्षात आले की  पुरुष हा  कष्टांची कामे करतो  त्यांमुळे जर त्याने नसबंदी केली तर तो कमजोर होईल, त्याची  विर्य पतन क्षमता कमी होईल  थोड्क्यात काय तर  त्याचा पुरुषार्थ नष्ट होईल!  तसेच स्त्रि  ही घरीच असते तीच्या कामाचे स्वरुप हे कमी कष्टांचे असते  मंग भले ती त्या कुंटुबासाठी चार-चार हंडे पाणी डोक्यावर मैलोंन मैल वाहुन आंणत असेल .........मुलींचे लग्न झाले  की तिने स्वयंपाक घर सांभाळावे  हे अपेक्षितच  आहे आपल्याकडे. हल्ली स्त्रियां घराबाहेर अर्थानजणासाठीही निघुलागल्या आहेत; परंतु त्यांची तारेवरची कसरत आणखीच वाढ्ली आहे. मी ज्या  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकवते ते  काम करुन शिक्षण घेणारे आहेत.  घरीजातअसताना रेल्वे स्टेशनवर  काही विद्यार्थींनी सोबत भेटल्या त्यांची धावपळ बघुण मी सहजच बोलले "रविवारी स्वंपाक घराला सुट्टी घ्या!" "अर्रे व्वा!  पण हे शक्य नाही मॅड्म कोण बनवीणार जेवण, मुलांच्या फर्र्माईशी कोण पुर्ण करणार?  एवढ्च काय तर नवराही आमचीच वाट बघत  असेल." 
मुंबईच्या शिकलेल्या    मुलींची ही  अवस्था बघुन ,ज्यांचे सक्षमीकरण झाल्याचा आपण दावा  करतो  त्या जेव्हा शिक्षण,नोकरी, संसांर यामध्ये  अशी कसरत करतात तेव्हा स्त्रिची  खरी ओढाताण कळ्ते.
आणि हीच बाजु जर पुरुषांची  पाहीली तर त्यांनाही दिवसभर थकूण आल्यानंतर त्यालाही कोणी जवळ घ्यावे,कवटाळावे, निरागस प्रेम मिळावे,त्याचे काम,त्याचे विचार समजाऊन  घेणे  हे  त्याला अपेक्षीत असते; पण हे त्याला  मुलांमध्ये - घरकामात व्यस्त असलेली स्त्री जेव्हा विसरते, तीला ते व्यक्त करण्याची गरज वाटत नाही  तेव्हा त्या  पुरुषाची ही ओढाताण होतेच.


एकीकडे स्त्रियांना होणारी मारहाण,छ्ळ,दबाव,तुछ्ता, कमी दर्जाची वागणूक आणि त्यामुळे होणारे स्त्रिचे हणन, कुंटूबासाठी  त्याग करणारी,सर्वांची सेवा करणारी स्त्री  सर्वांना ह्वी आहे तर दुसरीकडे पुरुषार्थाच्या सामाजिक व्याखेत गुरफड्लेला पुरुष  समाजाणे मान्य केला आहे.

या नात्यांच्या गुंतागुंतीला  आपण सगळे जबाबदार आहोत कारण आपणच समाज आहोत.  बारकाईने पाहीले तर हा गुंता नक्की सुटेल ;  जर  तिने आणि त्याने याची जबाबदरी उचली तर  दिवसभर थकलेल्या पतीची तितकीच काळ्जी जर का  त्याच्या पत्निने करणे गरजेचे  आहे तितकेच  स्व:तच्या पत्नीचा विचार करणारा पती ही गरजेचा आहे. व्यक्तीने स्वावंलबि आसावे जसे की जेवण,घराची स्वछ्ता ही कुंटूबाची गरज आहे आणि कुंटूबातिल सर्व सदस्यांनी जर त्याची जबाबदरी आपली समजून वाटुन घेतली तर   जिवन खरेच समांता पुर्ण होईल.  'ती ' आणि 'तो'  यांतील अंतरच नष्ट होईल  व फक्त "आम्ही" असु.........:)





Comments

Popular posts from this blog

“ती अशी का वागली असावी..........?”