Posts

Showing posts from November, 2014

मी एक पुरुष आहे ! मी एक स्त्रि आहे!!

मी लहान होते जवळ जवळ ७  ते ८ वर्षाची असेल, त्यावयातील इतर मुलांप्रमाणे मी आणि इतर मैत्रिणी खेळायचो, मजा-मस्ती-धमाल करायचो पण आता आठ्वतोय तो रोहीत! रोहीत माझा  बालमित्र, गोरा,नाजुक,तो रड्ला की लालबुंद होत असे.  आमच्या मुलींमध्ये खेळायला त्याला आवडायचे; आम्ही सुद्धा घेत असू  त्याला खेळायला. तो मुलीसोबत खेळ्तो म्ह्णुन  त्याला सगळे हसत,  मुलीत मुलगा लाडोंबा! .... पण इतरांप्रमाणे मीही त्याला चिडवले होतेच केव्हातरी......... आज  २० वर्षानी  त्या गोष्टीची  जाणीव होतेय!  कीती  चुकीच्या गोष्टी  होत्या त्या मुलांसारखे खेळ खेळणे, रोब गाजवणे, मोकळेपणाने न रडणे ही पुरुषी ओळख़ .  स्त्रि- व पुरुष  यांची  विभिन्नतेची  पाळेमुळे  बालपणापासूनच खुप खोलवर रोवली जातात आपल्यावर आणि मोठेपणीनी याच झाडाच्या सावलीचा खोटा आनंद उपभोगत असतो आपण सगळे. मनुष्याच्या वाढ्त्या वयाप्रमाणेच त्याचे अनुभव  देखील वाढ्त असतात. कुंटूबातील आपले वडील, भाऊ यांना आपला रक्षक,आधार म्हणुन पाहत मोठे होत  असतो, पण त्याच वेळी आपण आपल्या घराबाहेरील पुरूषांन पासून असुरक्षीत,भयभीत असतो, त्यांच्या सोबतीत सांक्षकता -अविश्वास असतो. मला आठ्