love your life .........because you and your life is very beautiful

smile smile smile and just smile .............because if your smile spread happiness in others life so why not!!!! :)

Tuesday, 13 December 2011

“ती अशी का वागली असावी..........?”


ती अशी का वागली असावी..........?”
रोजच्या प्रमणेच  आज ही सकाळी लवकर 7 ते 7.15 च्या दरम्यान शेलटर उघडत होते. मी दररोज लवकर येई म्ह्णून शेलटरची चावी माझ्या जवळच  दिली होती. शिवजीनगर  गावठाना मध्येच आम्ही एक वाडा भाडोत्तरी तत्वावर  घेतला होता.
सकाळी 7.30 ते सांयकाळी 5.00 वाजेपर्यँत येथे रस्त्यावरच्या मुलां करीता अनौपचरीक शाळा चालवण्यात येत असे.
या शाळेचा उद्देश हा –  रस्त्यावर राहणा-या मुलांना शिक्षणाच्या  प्रवाहात आणने.
                 ‌-  मुलांच्या हक्कांचा प्रचार- प्रसार  तसेच संरक्षण  करणे .
अनेकदा शहरतील शाळां मध्ये प्रवेश घेणारी मुले म्हंटल की निटनेटकी, गणवेश, ड्ब्बा, बुट- मोजे, दप्तर वगैरे अशीच डोळ्यां समोर पटकन  येतात ; परंतु आमच्या शाळेत प्रवेश घेणारी मुले ही  मानभर केस वाढ्लेली, त्यातच इकडून तिकडुन पडणा‌‌-या उवा - लिका, कपड्यांवर करकचटून बसलेली धूळ-माती आणि आंगभर माखलेला मळ !
या मुलांच्या दिवसाची सुरुवात ही साधारण ९.०० - १०.००  कधी १२.०० वाजताही होत असे. रस्त्यावर गाड्यांची रेलचेल वाढली की त्याच्या घंटा - गजराने आणि सुर्याच्या गरमागरम चटक्यांनी त्यांना त्यांचा फुट्पाथचा पलंग ईच्‍छा नसताना सुदधा सोडवा लागे.
बेडची टी व्यवस्था तर उठ्ल्या उठ्ल्या अगदी शेजारच्याच गाड्यांवर!  गरमा- गरम चह –पाव, बिस्कीट, बटर- क्रिमगोल, वड-पाव यांपैकी जी फरमाईश असेल ते मुले व त्यांचे आई- बाप असे सगळेच घेत.
दात घासणे हे कंटाळवाणे काम मनात आले तर करने नाही तर...........!!. पाण्याची  तशी काही कमतरता नव्ह्ती – शेजारीच  मुळा- मुठा वाहते शौचा पासुन सामुहीक स्नानापर्यँत सगळ्या प्रात:विधी    हिच्यातच होतात.  त्यानंतर पटरीवर (फुट्पाथ) हुंदड्या घालने, गुटका, दारु, चरस, भंग, अफ्फु-गांजा, व्हइटनर चे सुट्टे घेणे, सिनेमे पाहणे, भंगार वेचणे, जुवा खेळणे, डेपो वरच्या बस मध्ये चूकुन पडलेली चील्लर  शोधणे  यामध्ये त्यांची सायंकाळ होत ना होत तर इकडे  ४.०० वाजले रे वाजले की सगळे घरदार रात्रीच्या धंद्याच्या तयारीला लागे. कोणी फुगे फुगवणे- तर कोणी खेळ्णी घेवून आप-आपसाथ वाटून घेतलेल्या इलाख्यात माल विक्री साठी निघुन जात.
रात्री अनेक  जोडप्यांनी, प्रेम युगुलांनी,कॉलेजच्या पोरांनी गच्च भरलेला डेक्कन , फर्ग्युसन रोड ; तर आपल्या लहानग्यां सोबत आलेल्या आई- बाबा, आजी- आजोबांची सारसबागेत  आणि मॅगडोनलस च्या गर्दीमध्ये हरवलेल्या पुण्याला रस्त्यावरची ही मुले फुगे-खेळणी विकतात तर काही भीक मांगतात. त्यांचा अवतार बघुन ही गर्दी कधी त्यांना द्या तर कधी छुट्कारा म्ह्णुन, कोणी आपल्या प्रियसीला प्रभावित करण्यासाठी तर कोणी पुण्य कर्म  म्ह्णुन या मुलांना भिक देतात , त्यांच्या वस्तु विकत घेतात.

अशाच परस्थितीत या मुलांना आमच्या शाळेत बोलावणे, अनौपचारीक शिक्षण पदधतीतून व्यवहार अभ्यास, वाचन- लिखान, त्यांच्या स्व-संरक्षणासाठी शोषण व त्यांचे हक्क यांची माहीती करुन देणे, आरोग्य शिक्षण देणे, आणि त्याचबरोबर त्यांच्या पालकांना मुलांच्या विकासासाठी- उत्तम पालनपोषणासाठी जागृत करणे, छोट्या कुंटूंबाचे महत्त्व सांगणे  असे अनेक उपक्रम राबवणे हे आमचे काम !  त्यासाठी संस्था आम्हला महीन्याचा मोबद्द्ला मोजत होती हे सांगणे मह्त्त्वाचे! कारण आम्ही सर्वजण ही कामे मोफत करत नसून आमच्या उदरर्निव्हसाठी आम्हाला यातुन पैसा मिळ्तो हे या मुलांना व त्यांच्या पालकांना आम्ही स्पष्ट  केले होते.
असो !
या मुलांचा त्यांच्या पालकांना पैसा कमवण्यासाठी  फार मोठा फायदा होतो. किती विरोधाभास आहे बघा-
एखादे मुल त्या पती- पत्नी च्या प्रेमाचे प्रतीक ,त्यांच्यासोबत जिवनाला जोड्ली जाणारी एक अशी मजब्बुत कडी जिचा संपूर्ण विकास करण्यासाठी ते कुंटुंब प्रेम-मायेने, योग्य ते संस्कार देत मुलाला घडवते.
पण आजकाल  रोज सकाळी मला मुल हे उद्योगाचे साधन आणि चलते फिरते ATM (All Time Money Machine) म्ह्णुनच बघायला भेटत होते.
या मुलांना सहा- सहा - दहा भावंडे असतात.  बहुपत्नीत्व, बहुपतीत्व असे सगळे काही नियम येथे मान्यता प्राप्त असावेत कदाचीत!. मुलांना कळायला लागताच त्यांचे शारिरीक संबंध येत असे. १४ व्या १५ व्या वर्षीच ही मुले आपला संसार त्याच पटरी वर थाटत आणि परत तेच चक्र .!!.कॉग्रेस भवनच्या त्या फुट्पाथवर आणखी एक झोपड्डी ...........!!!!!!!!!!!!!!
कधी कधीतर मुलगी/ सुन , आई/ सासु सोबतच बाळांतीन होत. इथे जोपर्यँत एक स्त्री मुलांना जन्माला देवू शकते तोपर्यँत ती  ते देत. “ मशीन जब तक production देना बंद कर दे  तभी तो ये cycale  कही तो जाके रुकती ! ”
शेलटर मध्ये तशी आंघोळीची , दूध – जेवण, कपडे अशा प्राथमिक गरजा येथे उपलब्द होत्या म्हणुनच या मुलांनी सकाळी लवकर      उठून इथे ५.०० वाजेपर्यंत थांबावे आम्ही जे काही शिकवू ते  शिकावे अशी आमची अपेक्षा......!  हे सर्व त्यांच्यासाठी अगदी मोफत होते परंतु त्यांना याची थोडीही गरज नाही असे त्यांच्या पालकांना  वाटे “ उलट शाळेमुळे मुलांचे धंद्यावर लक्ष लागत नाही, ते स्वच्‍छ  राहिले की कोणी त्यांना भिक ही घालत नाही,  हमे हमारे बच्चे पढा लिखाके बॅरिस्टर नही बना ने है ! हम जेसे है वेसेही ठीक है” असे ते नेह्मी म्ह्णत, म्हणुन तर नव्हे....... पण रात्री मुलगा दारु पिऊन झोपला काय की मुलगी रात्र भर एखाद्या परपुरुषा सोबत फिरली काय त्यांना त्याची भ्रंता नव्ह्ती ! पण हेच आई-बाप  ही मुले शाळेत येऊ नये याची काळ्जी घेत.

शेलटर खोलतानाच एवढे सगळे विचार मनात येवून जातातोच outreach ला जाण्याची वेळ झली. खुप दिवस झाले सुरज शेलटरला येत नसल्याने मी फुटपातवर त्याच्या चौकशीसाठी गेले. तो झोपलेलाच होता मी त्याला हलवून उठवले . तो बेहोश झोपला होता रात्री बहुतेक व्हाईटनर घेतले असावे . २-३ वेळेस हलवल्यावर सुरज उठला, पटरीवरची इतर मुले ही सोबत होती. " सुरज आज कल तु शेलटर क्युँ नही आ रहे हो बेटा?" मी असे विचारताच तो त्याच्या मळ्क्या – फाटक्या गोधड्डीतून तोंड लपवत उठ्ला नी बोलू लागला....."दिदी घर में काम है और दादी भी नही भेजती है! " "क्युँ ?"  मी विचारले " काम कर बोली है , स्कुल जाके कुछ फायदा नही है वो लोग खुद के फायदे के लिए तुम्हे बेह्कते है  !"
सुरज शेलटरचा फारच हुशार मुलगा होता, आभ्यास करायला तर त्याला फार आवडे. इंग्रजी तर शिकण्यासाठी पाठ सोड्त नसे, कधी शिक्षक कामात असत तर स्वतः चा  अभ्यास स्वतः च शोधुन काढत असे. म्ह्णुंच सुरज आज जे बोलत होता ते येकून थोडे वाइट तर नाक्कीच वाटत होते. मी त्याला समजावनार तेच तिकडुन त्याची दादी आली. मला बघुन तिचा राग अनावर झाला आणि त्याच क्षणी कॉर्पेशनच्या त्या फुटपाथवर शिव्यांचा वर्षावच  माझ्यावर झाला.
मुलांसमोर स्वतः ला आवरण्याचा फारसा प्रर्यत्न केला तरी अश्रुनीं मात्र साथ सोड्ली  मी पट्कन मुठेच्या पाण्याकडे धाव घेत आपली असाह्यता लपवण्याचा निष्फळ प्रर्यत्न केला कारण माझ्या चिमुरड्यांना मी फसवू शकले नाही. ते माझ्या पाठी आले माझी समजुत काढु लागले ..." दीदी वो बुढ्ढी पागल है उसपे ध्यान मत दो..... " सुरज ही दादी वर चिडला होता ........."तु दीदी को क्युँ बोलती है .....मै नही जा रहा स्कूल .....यही हुँ कमाउंगा तेरे लिए."  " वो पैसे के लिए नही पढाती है हमे"
दादी ला या पुढे काही समजावने मला जरी शक्य होते तरी ती काही समजावून घेण्याच्या मनस्थितीत नव्ह्ती म्ह्णूंनच मी आणि मुले शेलटरला आलो . झाला किस्सा  विसरण्याचे नाटक करुन मी मुलांना त्यांच्या रोजच्या कार्यक्रमात गुंतवले खरे पण मी ती गोष्ट मात्र विसरु शकले नाही.
५-६ वर्षांचा असतानाच त्याच्या  आईचा आजारपणा मुळे  म्रुत्यु झाला होता. त्याच्या दारुड्या बापाने दुसरे लग्न केले होते; तेव्हा पासुनच सुरज आपल्या दादी सोबत राह्त होत. फुट्पाथवरच आयुष्य गेलेल्या दादीला आणखी दोन मुले-सुना- नातवांडे होती. तीची तिन्ही मुले नशेतच गुंग पडलेली असायची,  सुरज ने कमावलेला पैसा या कुंटुंबाचा आधार होता. तो हुशार असल्याने धंदा ही चांगला करे तर मंग रोजचा २००-२५० रुपये कमावना-या सुरज ने पैसे कमावने थांबवले आणि आभ्यासाला लागला तर आपले कसे भागनार? असा प्रश्न तिला पडला असावा....
पण मंग या मुलांना त्यांच्या पालकांकडून या पद्धतीचे संस्कार मिळत असतील त्यांच्या वर्तमाना बरोबरच त्यांचा भुतकाळालाही ज्वालामुखीचा दाह सह्न करावा लागत असेल आणि एवढे असूनही समाजाचाही या मुलांकडे पाहण्याचा द्रुष्टीकोन असाच राहिला तर.....................
कमळ जरी चिखलात  उगवले तरी त्याचा चिखल साफ करुंनाच ते आपण देवाला अर्पन करतो ना! असे असताना हा मळ साफ करण्याची तेवढी सामाजीक बांधीलकी आहे का आपल्यामध्ये?
“इतरांना प्रवाहासोबत घेवून जाणे तेवढेच कठीन आहे जेवढे प्रवाहाच्या विरोधात  वाहणे”    
मुलांच्या हक्कांसाठी अनेक कायदे आहेत, बालनिरीक्षन ग्रुहे आहेत , परंतु प्रत्येक वेळी मुलांचे संस्थांनीकरन करने शक्य नाही कारण मुलांची वाढ व विकास हा कुंटुंबात होणे तेवढेच गरजेचे आहे.
यासाठी आपल्या कायद्यान मध्ये फेरबदल व सक्तीचे अनुशाषन  करने गरजेचे आहे जसे की-
एका जोडप्यास कमाल 2 आपत्येच जन्माला देण्याचा आधीकार देणे. व त्या प्रत्येक आपत्यास शिक्षन घेणे या पदधतीची तरंतूद होने गरजेचे आहे.
यावर विचार करु....................

1 comment:

  1. ग्रेट.... खूप हॉरिबल वास्तव छान मांडलं आहेस... जगण्याचे खूप खोलवरचे अनुभव आहेत हे...... पुढच्या भागाची वाट पाहतोय.

    ReplyDelete