Posts

Showing posts from December, 2011

“ती अशी का वागली असावी..........?”

“ ती अशी का वागली असावी.......... ?” रोजच्या प्रमणेच  आज ही सकाळी लवकर 7 ते 7.15 च्या दरम्यान शेलटर उघडत होते. मी दररोज लवकर येई म्ह्णून शेलटरची चावी मा झ्या जवळच  दिली होती. शिवजीनगर  गावठाना मध्येच आम्ही एक वाडा भाडोत्तरी तत्वावर  घेतला होता. सकाळी 7.30 ते सांयकाळी 5.00 वाजेपर्यँत येथे रस्त्यावरच्या मुलां करीता अनौपचरीक शाळा चालवण्यात येत असे. या शाळेचा उद्देश हा –  रस्त्यावर राहणा-या मुलांना शिक्षणाच्या  प्रवाहात आणने.                  ‌-  मुलांच्या हक्कांचा प्रचार- प्रसार  तसेच संरक्षण  करणे . अनेकदा शहरतील शाळां मध्ये प्रवेश घेणारी मुले म्हंटल की निटनेटकी , गणवेश , ड्ब्बा , बुट- मोजे , दप्तर वगैरे अशीच डोळ्यां समोर पटकन  येतात ; परंतु आमच्या शाळेत प्रवेश घेणारी मुले ही  मानभर केस वाढ्लेली , त्यातच इकडून तिकडुन पडणा‌‌-या उवा - लिका , कपड्यांवर करकचटून बसलेली धूळ-माती आणि आंगभर माखलेला मळ ! या मुलांच्या दिवसाची सुरुवात ही साधारण ९.०० - १०.००  कधी १२.०० वाजताही होत असे. रस्त्यावर गाड्यांची रेलचेल वाढली की त्याच्या घंटा - गजराने आणि सुर्याच्या गरमागरम चटक्यांनी त्यांना त्यांचा